बँका प्रत्येकाला सेवा पुरवितात, अगदी वैयक्तिक ते व्यवसाय मालक आणि कॉर्पोरेशनपर्यंत. त्यानुसार भारतीय बँकिंग प्रणालीकडून विविध प्रकारची खाती ऑफर केली जातात. तर आपण भारतातील सहा प्रकारची बँक खाती पाहूया.

भारतातील 6 प्रकारची बँक खाती

1. बचत खाते

बचत खाते हे नियमित ठेव खाते आहे ज्यावर आपल्याला किमान व्याज मिळते. यामध्ये मासिक व्यवहाराच्या संख्येवर मर्यादा आहेत. लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबांना बँक बचत खाते ऑफर करते. यामध्ये शून्य शिल्लक खाते आणि इतर आधुनिक वैशिष्ट्ये असून बिल देयके, डेबिट कार्ड आणि ऑटो स्वीप यांचा समावेश होतो.

2. चालू खाते

हा खाते प्रकार उद्योजक, व्यवसाय मालक आणि व्यापाऱ्यांसाठी आहे. त्यात अधिक रोख ठेवी असतात. अधिक संख्या आणि व्यवहाराची वारंवारता सुलभ करते, आणि दैनंदिन व्यवहारावर मर्यादा नसते. याव्यतिरिक्त, या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते जी खातेदाराला खात्यात असणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची मुभा देते. तथापि, चालू खाते हे शून्य व्याज खाते आहे आणि त्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असते.

3. मुदत ठेव

खातेमुदत ठेव खाते, ज्याला FD म्हणून ओळखले जाते, खात्यात आपल्याला एकरकमी रक्कम जमा करता येते आणि त्यावर कालावधीप्रमाणे (जो सात दिवस ते दहा वर्षापेक्षा कमी असू शकते) विशिष्ठ व्याज दर आकारण्यात येतो. काही बँका जेष्ठ नागरिक आणि महिलांना जमा केलेल्या रकमेवर जास्त व्याज दर देतात.

मुदतठेवीमध्ये रक्कम जमा करणे म्हणजे ठरलेल्या कालावधीसाठी रक्कम लॉक करणे होय. असे असले तरीही अनेक बँकांची ऑनलाईन बँकिंग सुविधा अकाली FD बंद करण्यास आणि त्यावेळेपर्यंत जमा झालेल्या व्याजास परवानगी देतात . त्याशिवाय, ऑनलाईन बँकिंगने FD उघडण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन दिले आहे. आता आपण काही मिनिटातच FD उघडू शकता.

4. आवर्ती ठेव खाते

आवर्ती ठेव खाते यालाच RD म्हणतात, हे एक लोकप्रिय आणि पारंपारिक खाते आहे यामध्ये आपण निवडलेल्या मुदतीप्रमाणे आपल्याला सहा महिने ते दहा वर्षापर्यंत आवर्ती आधारावर मासिक किंवा त्रैमासिक काही ठराविक रक्कम जमा करावी लागते. या प्रकारच्या खात्यात कालावधी संपेपर्यंत खातेदारास ठराविक व्याजदराने व्याज दिले जाते.

तथापि, RD आपल्याला कालावधी आणि आवर्ती रक्कम बदलण्याची परवानगी देत नाही. याशिवाय काही बँका कमी व्याजदारानुसार दंड आकारून RD अकाली बंद करण्याची परवानगी देतात.

5. पगार खाते

नावाप्रमाणेच, पगार खाते हे आपल्या नियोक्त्याशी असलेल्या संबद्धतेनुसार उघडले जाते आणि दरमहा आपला पगार या खात्यामध्ये जमा होतो. एखादया कंपनीचा कर्मचारी म्हणून आपण आपल्याला हव्या असलेल्या वैशिष्टांप्रमाणे पगाराचा प्रकार निवडू शकता. पगाराव्यतिरिक्त आपणास पगार खात्यामध्ये भरपाईसुद्धा मिळते.

6. NRI खाते

आता परदेशी वास्तव्यास असलेल्या भारतीयांचे काय? अशा लोकांसाठी बँक NRI खात्याची सुविधा देते. बँक देत असलेल्या NRI खात्याच्या विविध प्रकारांमध्ये खालील घटकांचा समावेश होतो,

  • अनिवासी सामान्य (NRO):

हे रुपये चलनामधील खाते आहे, जेथे NRI खात्यामध्ये विदेशी चलनामध्ये रक्कम जमा करतात आणि ते रुपयामध्ये रुपांतरीत होतात. या खात्यामध्ये NRI परदेशातील रक्कम ठेवू शकतात.

  • अनिवासी बाह्य (NRE):

NRO प्रमाणेच, NRE मध्ये रुपयांमध्ये रक्कम ठेवली जाते. तथापि, हे खाते फक्त परदेशी मिळवलेले पैसे जमा करण्यासाठीच आहे.

  • विदेशी चलन अनिवासी (FCNR):

FCNR खात्यामध्ये विदेशी चलनामध्ये रक्कम ठेवली जाते. यामुळे NRI खाते धारकांना खात्यामधून मुद्दल आणि व्याज हस्तांतरित करणे शक्य होते. तथापि,भारतात यावर व्याज आकारले जात नाही.

या ब्लॉगवरून भारतातील बँकेच्या विविध प्रकारांबद्दल आपल्याला पुरेशी माहिती मिळाली असेल अशी आम्हाला आशा आहे. अशाच प्रकारच्या आर्थिक साक्षरतेच्या सामग्रीसाठी अर्थशिक्षण पोर्टलवर भेट देत रहा.