बँकेकडून प्रत्येक ग्राहकासाठी देण्यात येणाऱ्या मूलभूत सेवा म्हणजे ठेव स्वीकारणे, खातेदाराच्या खात्यात ती (ठेव) जमा करणे, आणि उपलब्ध जमा रकमेवर खातेदारास आवश्यकतेनुसार रक्कम काढण्याची परवनागी देणे. त्यानुसार, या ब्लॉगमध्ये ग्राहकांशी संबंधित विविध बँकिंग कार्यांविषयी माहिती दिलेली आहे. यामध्ये पैसे काढण्याच्या पद्धती, पासबुक्स, डिमांड ड्राफ्ट, आदाता चेक, धारक चेक इत्यादींचा समावेश आहे. चला तर मग, सुरुवात करूया!
पैसे काढणे म्हणजे काय?
नावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणेच, पैसे काढणे म्हणजे एखादया विशिष्ट खात्यातून पैसे काढण्याच्या क्रियेचा संदर्भ. पैसे काढण्याच्या पद्धती अनेक वर्षांमध्ये विकसित झाल्या आहेत. दोन दशकांपूर्वी, स्वयंचलित टेलर मशीन्स (ATMs) उपलब्ध नसताना लोकांना बँकेत जावे लागे, पैसे काढण्यासाठी कुपन घ्यावे लागे आणि रांगेत उभे राहून स्वतःचा नंबर येण्याची वाट पहावी लागे. हे फक्त वेळकाढू काम नव्हते परंतु जेव्हा खातेदाराला रोख रक्कम हवी असे तेव्हा त्याला बँकेमध्ये जावे लागे.
तथापि, इस.2000 च्या मध्यात बऱ्याच प्रतीक्षेनंतर ATMs ची सुविधा उपलब्ध झाल्याने पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ झाली. यामुळे लोकांना बँकेमध्ये न जाता किंवा त्यांच्या कामाच्या वेळेची चिंता न करता कधीही आणि कोठेही सहजपणे पैसे काढता येऊ लागले. याशिवाय, आपण दुसऱ्या प्रक्रियेचा अवलंब करून पैसे काढू शकता ज्याकरिता आपण स्वतः बँकेमध्ये जाणे, पैसे काढण्यासाठी स्लीप भरणे आणि ती सादर करणे आवश्यक असते. चला, या दोन्ही प्रक्रियांवर नजर टाकू.
स्लिप भरून पैसे काढण्याच्या पद्धती विषयी
- बँकेमध्ये जा
- पैसे काढण्यासाठी लागणारी स्लीप घ्या आणि आवश्यक माहिती भरा
- यामध्ये काढण्याची रक्कम,ज्या खात्यामधून पैसे काढायचे आहेत तो खाते क्रमांक, स्वाक्षरी, चलनाचे मूल्य इत्यादीचा समावेश असतो
- आपला नंबर येण्याची वाट पहा
- टेलरकडे पैसे काढण्याची स्लीप सुपूर्द करा
- टेलर आपणास पोचपावती देतो
- तो त्यानंतर रोख रक्कम मोजतो आणि ती आपणास देतो
ATM मधून पैसे काढण्याच्या पद्धती विषयी
- जवळच्या ATM मध्ये जा
- कार्ड स्लॉटमध्ये आपले कार्ड घाला
- आपल्या पसंतीची भाषा निवडा
- आपला चार अंकी ATM पिन टाइप करा
- “रोख रक्कम काढणे” वर क्लिक करा (बटण किंवा स्क्रीन टचवरून)
- आवश्यक रक्कम प्रविष्ट करा. (आपल्या खात्यातील शिल्लक रकमेनुसार)
- “पुष्टी करा” वर क्लिक करा
- मशीनमधून चलनी नोटा बाहेर येण्याची वाट पहा
- त्यानंतर बाहेर आलेल्या नोटा आणि आपले डेबिट कार्ड परत काढून घ्यायला विसरू नका
पासबुक म्हणजे काय?
आपण पासबुक हा शब्द ऐकला असेलच. काही दशकांपूर्वी जरी याचा वापर इतका सर्रास होत नव्हता, तरी अजूनही बँक पासबुक हे उपयोज्य आणि महत्वपूर्ण बँकिंग कागदपत्र म्हणून समजले जाते. आपण ज्या बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेमध्ये खाते उघडले आहे त्यांनी दिलेले बँक पासबुक ही एक पुस्तिका आहे. आपले डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग तपशील समाविष्ट करून बँक, वेलकम कीट किंवा बँकिंग कीटमध्ये ते (पासबुक) आपणास देते.
बँक पासबुकच्या पहिल्या पानावर आपला खाते क्रमांक, ग्राहक ID, शाखेचा IFSC कोड, आपले नाव, पत्ता इत्यादीसारख्या माहितीचा समावेश असतो. पासबुकमुळे आपणास आपल्या खात्यामध्ये झालेल्या व्यवहारांचे संक्षिप्त स्टेटमेंट मिळण्यास मदत होते. अलीकडच्या काळामध्ये बँका ऑनलाईन स्टेटमेंट तयार करत असल्या तरी बँकेमध्ये जाऊन आपण आपले पासबुक अपडेट करणे केव्हाही चांगले कारण यामुळे आपल्याला व्यवहाराचा प्रत्यक्षपणे आढावा ठेवता येतो.
आदाता खाते जमा चेक म्हणजे काय?
आदाता खाते जमा चेकला विशिष्ट प्रकारचे चेक पेमेंट समजले जाते कारण निर्दिष्ट रक्कम आदात्याच्या खात्यामध्ये जमा होत असून आदाता ती अन्य कोणाच्याही खात्यामध्ये हस्तांतरीत करू शकत नाही. आदाता खाते जमा चेक कसा लिहावा ते पाहूया.
- सर्वप्रथम चेकच्या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात दोन क्रॉस रेषा काढा, आणि त्या रेषांमध्ये ‘आदाता खाते जमा’ असे लिहा.
- तथापि, आपण केवळ चेकवर क्रॉस केले आणि आदाता खाते जमा असे लिहिले नाही तर बँक त्याचाआदाता खाते जमा म्हणून नाही तर केवळ क्रॉसचेक म्हणून विचार करेल याची नोंद घ्या.
धारक चेक म्हणजे काय?
धारक चेकवरची रक्कम ही चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला किंवा धारकाला दिली जाते. यावर आदाता म्हणून कोणत्याही नावाचा उल्लेख नसतो परंतु फक्त किती पैसे काढायचे आहेत त्या रकमेचा उल्लेख असतो. बँकेमधून रक्कम घेण्यासाठी धारक चेक दाखविणाऱ्या व्यक्तीला चेकवरची रक्कम दिली जाते. आपण धारक चेक हस्तांतरित करू शकत नाही. आपण तो केवळ वितरण करून हस्तांतरित करू शकता. तथापि, धारक चेक ही पैसे काढण्याची सुरक्षित पद्धत नाही कारण चेक गहाळ झाला तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
धारक चेकने पैसे काढण्यावर काही मर्यादा आहेत का? नाही. एखादया कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारांचे पैसे काढण्यासाठी धारक चेक काढला तर बँक सहसा जास्त रकमेचा धारक चेक स्वीकारून रोख रक्कम देते. तथापि, तो चेक एखादया व्यक्तीसाठी असल्यास त्यावर निर्बंध लागू होऊ शकतात.
ठेवी म्हणजे काय?
भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये चार प्रकारच्या ठेवी उपलब्ध आहेत. चला, प्रत्येक प्रकाराविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.
चालू खाते:
चालू खाते:डिमांड डिपॉझीट म्हणूनही ओळखले जाते आणि व्यावसाय करणाऱ्या व्यक्ती या खात्याचा वापर करतात. या खात्यावर दैनंदिन व्यवहाराच्या संख्येवर कोणतेही निर्बंध घातले जात नाहीत. याव्यतिरिक्त, या खात्यावरून खातेदारांना ओव्हरड्राफ्ट सुविधा पुरविली जाते. तथापि, बँक चालू खात्यावर कोणतेही व्याज देत नाही आणि ते चालू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शुल्क आकारले जाते.
बचत खाते:
मर्यादित उत्पन्न असणाऱ्या आणि काही प्रमाणामध्ये पैसे साठवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी बचत खाते हा योग्य पर्याय आहे. या खात्यावर खातेदाराला व्याजाची विशिष्ट रक्कम मिळते जी बँकेनुसार बदलते. यामुळे खातेधारकाला वेळेमध्ये एकाच ठिकाणी रोख रक्कम जमा करणे शकत होते. तथापि, बचत खात्यावर झालेल्या व्यवहारांच्या संख्येवर बँक निर्बंध घालते.
मुदत ठेव:
मुदत ठेव हा ठेवींचा परंपरागत लोकप्रिय प्रकार आहे. येथे ठराविक कालावधीसाठी आपण आपले पैसे जमा करता (सात दिवसापासून दहा वर्षांपर्यंत) आणि आपल्याला पाच ते नऊ टक्के व्याजदराने निश्चित परतावा मिळतो. काही बँका त्यावरील दंडासहित अकाली FD बंद करण्यास परवानगी देतात.
आवर्ती ठेव:
आवर्ती ठेव हा अजून एक पारंपारिक ठेविचा प्रकार आहे, ज्यात ठेवीदार सहा महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीसाठी आवर्ती स्वरुपात मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने ठराविक रक्कम जमा करतो. FD प्रमाणेच, RD वर देखील ठराविक व्याज दर दिला जातो. दंडाचे शुल्क भरून आपण RD अकाली बंद करू शकता.
डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय?
डिमांड ड्राफ्ट ही एक प्रीपेड निगोशिएबल देयक पद्धत आहे,जेव्हा आदाता DD सादर करतो तेव्हा ड्रॅाईबँक पैसे देण्याची जबाबदारी स्वीकारते. रक्कम प्राप्त करण्यासाठी संबंधित बँकेने DD देणे आवश्यक आहे किंवा क्लिअरिंग प्रक्रियेच्या माध्यमातून तो DD ताब्यात घेणे आवश्यक आहे. आपण रोख किंवा चेकच्या माध्यमातून डिमांड ड्राफ्ट भरू शकता. तथापि, चेकची रक्कम रुपये 50,000/- पेक्षा जास्त असेल तरच DD साठी चेकवरून देय उपलब्ध आहे.
अर्थशिक्षण पोर्टलवर आर्थिक साक्षरता जनजागृती करण्याबद्दल बरेच काही आहे. आपली आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी आमच्या ब्लॉग स्पेसचे अनुसरण करा.