साध्या शब्दात सांगायचे झाले तर बँक ही एक वित्तीय संस्था आहे, ज्यामध्ये आपल्याला पैसे जमा करणे, साठविणे, काढणे शक्य होते तसेच आपल्याला कर्जारूपाने (पैसे) दिले जातात. बँकिंग सेवेमुळे प्रत्येक अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण क्षेत्र तयार होते आणि एखाद्या विशिष्ट देशाच्या बँकिंग प्रणालीमुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांना अनेक लाभ मिळतात. या ब्लॉगच्या माध्यमातून बँकिंगचे पाच फायदे पाहू.

बँकिंगचे 5 फायदे

1. सुरक्षितता

बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित राहतात. जेव्हा आपण किंवा बाहेरील व्यक्ती खात्यामध्ये पैसे जमा करते तेव्हा बॅंका डिजिटल खाती तयार करतात. परिणामी आपल्याला घरामधील लॉकरमध्ये पैसे वाचविण्याचा धोका पत्करावा लागत नाही. त्याऐवजी, आपले पैसे बँकेत जमा केल्याने ते सुरक्षित राहतात.

2. बचत करणे शक्य होते

घरात पैसे ठेवल्याने अनावश्यक आणि अनियंत्रित खर्च होऊ शकतात. तथापि, बँकेत पैसे जमा केल्याने आपले पैसे वाचवायला मदत होते आणि तुम्ही ते गरज असेल तेव्हा त्याचा वापर करता यावा यासाठी आपल्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम असणे आवश्यक असते. याशिवाय, या दिवसांमध्ये रकमेचे निरंतरपणे आणि त्वरित हस्तांतरण करता यावे यासाठी बॅंकांकडून ATMs आणि मोबाइल अनुप्रयोगची ऑफर दिली जाते.

3. बचतीवर व्याज मिळते

बँका बचतीवर विशिष्ट व्याज दर देतात. जोखीम पत्करण्याऐवजी आणि आपल्या पारंपारिक घरच्या लॉकरमध्ये रोख रक्कम बाळगण्याऐवजी आपल्या बचतींवर काहीतरी कमावण्याची संधी आहे.

4. FD आणि RD सारखे गुंतवणूकीचे पारंपारिक पर्याय

बँका फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट (RD) सारखे गुंतवणूक पर्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहेत . FD करण्यासाठी आपणास आपल्या खात्यामध्ये काही विशिष्ट रक्कम जमा करणे आणि ती मुदतपूर्ती होईपर्यंत ठेवणे आवश्यक आहे. मुदतपूर्तीच्या वेळी आणि ठेवीच्या कालावधीनुसार आपणास त्यावर व्याज मिळते. आपण मासिक व्याज मिळविणे किंवा मुदतपूर्तीच्या वेळी, व्याजासह मुद्दल मिळवणे पर्याय निवडू शकता ज्यामुळे आपल्या बचत खात्यामध्ये पैसे जमा होतात किंवा FD चे स्वयं-नुतनीकरण केले जाते. दुसरीकडे, RD च्या बाबतीत आपल्याला RD खात्यामध्ये एका विशिष्ट तारखेला, विशिष्ट रक्कम, उदाहरणार्थ दरमहा रुपये 5,000/- भरणे आवश्यक आहे. मॅन्युअल बँकिंगच्या बाबतीत, आपल्याला ते स्वतःच भरावे लागतील. तथापि, आपल्या स्थायी सुचनांनुसार ई-बँकिंगच्या बाबतीत आपल्या खात्यातून रक्कम स्वयंचलितपणे वजा केली जाते किंवा आपण निर्दिष्ट तारखेला ती आपल्या RD खात्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन जमा करणे आवश्यक आहे. मुदतपूर्तीच्या वेळी मुद्दल आणि व्याज आपल्या खात्यामध्ये जमा होते.

5. कर्जासाठी अर्ज करणे

आर्थिक ईको-सिस्टीममध्ये बँका असण्याचा हा महत्वपूर्ण फायदा आहे. बँका कर्जाच्या रूपात पैसे देतात आणि कर्जदारास विशिष्ट व्याज दर आकारतात. कर्जदाराला निर्धारित वेळेमध्ये व्याजाची परतफेड करणे आवश्यक असते. अर्जदाराच्या प्रकरणाचा काळजीपूर्वक विचार करून आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर, बँका गृह कर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी विविध प्रकारचे कर्ज ऑफर करतात. या लेखामधून आपल्याला बँकिंगच्या लाभांविषयी चांगली माहिती मिळाली आहे अशी आम्ही आशा करतो. अर्थशिक्षण या पोर्टलच्या माध्यमातून देशातील प्रत्येक भागामध्ये FinTech विषयी जागरुकता वाढविणे आणि भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध स्थानिक भाषांमधील माहितीपूर्ण व्हिडिओ आणि ब्लॉग्जच्या साहाय्याने लोकांना या पोर्टलविषयी चांगली माहिती पुरविणे हे आमचे ध्येय आहे. म्हणूनच, अर्थशिक्षण पोर्टलवर सातत्याने भेट देऊन आमच्याबरोबर आपली आर्थिक जागरुकता वाढवत रहा.