पर्मनंट अकाऊंट नंबर ज्याला PAN म्हणून ओळखले जाते, ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्यामध्ये विशिष्ट PAN वरून एखादया ठराविक व्यक्तीची किंवा कंपनीची कर संबंधित माहिती नोंदवली जाते. PAN हा वैशिष्ट्यपूर्ण क्रमांक आहे आणि म्हणूनच कर भरणाऱ्या दोन व्यक्ती, कंपनी किंवा संस्थांमध्ये एकच PAN असू शकत नाही. आता आपण PAN कार्डचे फायदे,PAN अर्ज करण्याची प्रक्रिया, PAN अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे इत्यादी काही प्रश्न पाहू.

1. PAN चे विविध प्रकार कोणते?

PAN च्या विविध प्रकारांमध्ये
 • वैयक्तिक कंपनी
 • ट्रस्ट
 • सोसायटी
 • HUF
 • हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली
 • परदेशी
 • भागीदारी/संस्था

2. PAN कोण जारी करते?

भारत सरकारच्या आयकर विभागाकडून PAN जारी केले जाते.

3. PAN आजीवन आहे का?

होय, PAN ची वैधता आजीवन आहे.

4. PAN कार्डसाठी अर्ज करण्यास लागणारी वेगवेगळी कागदपत्रे कोणती?

PAN साठी अर्ज करण्यास आपल्याला दोन प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात – पत्त्याचा पुरावा (POA) आणि ओळख पुरावा (POI).
वैयक्तिक POA/ POI – पासपोर्ट, मतदार ID, वाहन परवाना, आधार
ट्रस्ट चॅरिटी कमिशनरने जारी केलेल्या ट्रस्ट डीडची किंवा नोंदणी क्रमांकाच्या दाखल्याची प्रत.
कंपनी (भारतात नोंदणीकृत) कंपनी निबंधक – नोंदणी प्रमाणपत्र जारी करते.
हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली HUF च्या प्रमुखांनी HUF आणि POA आणि POI चा तपशील
सोसायटी सहकारी संस्थांच्या निबंधक किंवा धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी क्रमांकाचे प्रमाणपत्र
भागीदारी/संस्था (LLP) संस्था किंवा मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी व भागीदारी करारनामाद्वारा निबंधकाने जारी केलेले नोदणीकृत प्रमाणपत्र
वरील घटकांव्यतिरिक्त,परदेशी नागरिक देखील PAN कार्डसाठी अर्ज करू शकतात. हे करण्यासाठी त्यांना भारत सरकारने जारी केलेला पासपोर्ट, PIO/ OCI , राहत्या देशाचे बँक स्टेटमेंट आणि भारतात NRE बँक स्टेटमेंटची एक प्रत सादर करणे आवश्यक आहे.

5. PAN साठी अर्ज कसा करावा?

आपण PAN साठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रक्रियेवरून अर्ज करू शकता. PAN साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि PAN ऑफलाईन अर्ज करण्यासाठी टप्प्या टप्प्याने प्रक्रिया पाहूया.

ऑनलाइन PAN अर्ज प्रक्रिया

 • NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाईटवर जा
 • त्यामध्ये दिलेल्या तपशिलांसह आवश्यक फॉर्म भरा
 • आवश्यक कागदपत्रे सादर करा आणि प्रक्रिया शुल्क भरा
 • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकारी दिलेल्या पत्त्यावर PAN कार्ड पाठवतील

ऑफलाईन PAN अर्ज प्रक्रिया

 • अधिकृत PAN केंद्राला भेट दया आणि PAN अर्ज मिळवा
 • अर्जाचा फॉर्म भरा
 • आवश्यक कागदपत्रे जोडा
 • प्रक्रिया शुल्क भरून फॉर्म सादर करा
 • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकारी आपण दिलेल्या पत्त्यावर PAN कार्ड पाठवतील

6. PAN साठी अर्ज करताना किती खर्च येतो?

PAN साठी अर्ज करण्याचे शुल्क हे रुपये 93/-+ GST इतके आहे. तर भारतीय संप्रेषणाच्या पत्त्यासाठी एकूण किंमत रुपये 110/- आहे.

7. PAN कार्ड हरवल्यास PAN साठी पुन्हा अर्ज कसा करावा?

आपले PAN कार्ड हरवले, आता काय करायचे? काही हरकत नाही, असे झाल्यास घाबरू नका किंवा त्रास करून घेऊ नका. आपण PAN कार्डच्या नक्कल प्रतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. पहिल्यावेळी PAN कार्डसाठी अर्ज करताना आपण केलेल्या जवळपास त्याच प्रक्रियेचे अनुसरण करा. NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाईटवर जा, आपण भारतीय नागरिक असल्यास फॉर्म 49-A भरा किंवा परदेशी असल्यास फॉर्मफॉर्म 49-AA भरा, PAN कार्डच्या नक्कल प्रतीसाठी ऑनलाइन पैसे भरा. अधिकारी आपले PAN कार्ड 45 दिवसांच्या आत पाठवतील.

8. आपल्याला PAN कार्डची आवशक्यता का आहे?

PAN असल्याने बऱ्याच आवश्यक प्रक्रिया सोप्या आणि जलद झाल्या आहेत. त्याप्रमाणे, PAN कार्डच्या काही लाभांमध्ये खालील घटक समाविष्ट आहेत.
 • पत्त्याचा पुरावा
 • ओळखीचा पुरावा
 • व्यवसाय नोंदणी
 • कर भरणे
 • फोन कनेक्शन मिळवणे
 • गॅस कनेक्शनसाठी अर्ज करणे
 • डिमॅट खाते उघडणे
 • म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे
 • बँक खाते उघडण्यास आणि चालवण्यास पात्र होणे
 • आर्थिक व्यवहार करणे
 • कर परताव्याचा दावा करणे
PAN कार्डसाठी अर्ज केल्यास आपणास अनेक मार्गांनी लाभ होतात. एक प्रकारे त्यावरून आपली विश्वासार्हता प्रस्थापित होते आणि आपण भारताचे जबाबदार नागरिक असल्याचे दर्शविले जाते. म्हणून आपल्याकडे अद्याप PAN कार्ड नसेल तर आपण त्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील लाभांकरिता पात्र होण्यासाठी ते मिळवा. आर्थिक साक्षरतेबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या ब्लॉग स्पेसचे अनुसरण करा.