डिजिटल-युगाच्या बँकिंग क्षेत्रातील सुजाण ग्राहक म्हणून आपल्याला NEFT, RTGS आणि IMPS या संज्ञा माहित असणे आवश्यक आहे. अर्थातच या सर्व संज्ञा ऑनलाईन निधी हस्तांतरणाशी निगडीत आहेत. तथापि, यामधील प्रत्येक संज्ञा काय आहे याचा स्वतंत्रपणे आपण काही विचार केला आहे का? प्रत्येकाचे फायदे आणि तोटे, ते एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत आणि ते कसे वापरावे? आपल्याला याविषयी काही माहिती नसेल तर अर्थशिक्षणाच्या या ब्लॉगवरून त्याची उत्तरे मिळतील.

NEFT

NEFT म्हणजे काय?

RBI ने ओळख करून दिल्याप्रमाणे, NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर. यामुळे भारतात कोठेही त्वरित पैसे हस्तांतरित करता येतात. तथापि, NEFT वरून निधी हस्तांतरण सुलभ होण्यासाठी, त्यात गुंतलेल्या बँकांच्या शाखा NEFT सक्षम असणे गरजेचे आहे. आता आपण NEFT बाबत काही साधक आणि बाधक बाबी पाहूया.

NEFT चे फायदे आणि तोटे

NEFT चे फायदे

  • रीअल-टाईमच्या जवळपास निधी हस्तांतरण
  • सुरक्षित निधी व्यवस्था
  • ईमेल/SMS वरून लाभकर्त्याच्या खात्यावर पाठवलेल्या जमेचे सकारात्मक पुष्टीकरण
  • वर्षभर 24/7 निरंतर उपलब्ध

NEFT चे तोटे

  • ही पद्धत सुरक्षित आहे, पण ऑनलाईन निधी हस्तांतरण प्रणाली म्हणून हॅकिंगची शक्यता असल्याने डेटा असुरक्षित राहतो.
  • ऑनलाईन निधी हस्तांतरण प्रणालीसंबंधी माहिती नसलेले लोक NEFT वरून निधी हस्तांतरण करू शकत नाहीत.

ऑनलाईन निधी हस्तांतरणासाठी NEFT कसे वापरावे?

आता दहा सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून NEFT हस्तांतरण कसे करायचे ते पाहू.

1. आपल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग पृष्ठावर साइन इन करा

2. मुख्य स्क्रीनवरील निधी हस्तांतरण पर्यायावर क्लिक करा

3. NEFT पर्याय निवडा

4. दिलेल्या यादीतून योग्य लाभार्थी निवडा

5. लाभार्थीचे नाव आधीपासून समाविष्ट केले नसेल तर ते “लाभार्थी समाविष्ट करा” बटणावर क्लिक करा

6. लाभार्थीचा आवश्यक तपशील प्रविष्ट करून, त्याचे सत्यापन करून पुष्टी करा

7. नवीन लाभार्थीचे नाव समाविष्ट केल्याची पुष्टी करण्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर चार अंकी OTP येईल

8. लाभार्थीचे नाव खात्यामध्ये समाविष्ट केले जाईपर्यंत प्रतीक्षा करा

9. आता लाभार्थीचे नाव निवडा आणि बँक खाते निवडा ज्यामधून पैसे हस्तांतरित केले जातील

10. योग्य रक्कम प्रविष्ट करा आणि NEFT हस्तांतरण सुरु करण्यासाठी पुष्टी करा बटणावर क्लिक करा

RTGS

RTGS म्हणजे काय?

RBI ने 2004 मध्ये ही सेवा सुरू केली, RTGS हे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटचे संक्षिप्त रूप आहे. रिअल टाइममुळे हे निरंतर रिअल-टाईममधेच निधी हस्तांतरण शक्य होते, ज्यामुळे बँकेकडून त्यांना मिळालेल्या प्रक्रियेच्या सूचनांचा संदर्भ मिळतो. दुसरीकडे, ग्रॉस सेटलमेंट म्हणजे निर्देशांच्या आधारे सूचनेवर निधी हस्तांतरण सूचना हाताळणे होय.

RTGS चे फायदे आणि तोटे

RTGS चे फायदे

  • RTGS हस्तांतरणासाठी कमाल मर्यादा नाही
  • पूर्ण-दिवस निधी हस्तांतरणाची उपलब्धता
  • बँक शाखेतून रिअल-टाईममध्ये निधी हस्तांतरणाची सक्षमता
  • डिमांड ड्राफ्ट किंवा प्रत्यक्ष धनादेश जारी करण्याची आवशक्यता दूर करणे
  • हस्तांतरणासाठी कोणतेही शुल्क किंवा मूल्य नाही
  • पैसे कधीही आणि कोठूनही हस्तांतरित करता येऊ शकतात

RTGS चे तोटे

  • RTGS करण्यासाठी किमान रक्कम रुपये 2 लाख आहे ज्याला वरची मर्यादा नाही
  • हे आपल्या ग्राहकांना संबंधित व्यवहाराचा मागोवा घेण्याची परवानगी देत नाही

RTGS हस्तांतरण कसे करावे?

ऑनलाइन RTGS हस्तांतरण करण्याच्या पायऱ्या पाहूया.

1. आपल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंगमध्ये साइन इन करा

2. वेबसाईटच्या मुखपृष्ठावर निधी हस्तांतरणावर क्लिक करा

3. लाभार्थीचे पर्याय निवडा

4. उपलब्ध इंटर-बँक देयकाच्या पर्यायामधून RTGS पर्याय निवडा

5. आवश्यक तपशिलासह नमूद करताना लाभार्थीचे नाव समाविष्ट करा

6. अटी आणि नियम स्वीकारा यावर क्लिक करून पुष्टी करा

7. मोबाइल नंबरवर आपल्याला अत्यंत-सुरक्षित पासवर्ड मिळेल

8. लाभार्थ्यास अधिकृत करण्यासाठी तो पासवर्ड प्रविष्ट करा.

9. लाभार्थीचे नाव समाविष्ट करण्यासाठी सुमारे 30 मिनिटे ते काही तास लागतात

10. एकदा लाभार्थीचे नाव समाविष्ट झाले की निधी हस्तांतरण/देयक हस्तांतरण टॅबवर जा आणि RTGS वर क्लिक करा

11. आवश्यक रक्कम प्रविष्ट करा आणि योग्य लाभार्थी निवडा

12. अटी आणि नियम स्वीकारा यावर क्लिक करा आणि हस्तांतरणाची प्रक्रिया करण्यासाठी पुष्टी करा

IMPS

IMPS म्हणजे काय?

IMPS हे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस याचे संक्षिप्त रूप आहे. RBI आणि NPCI यांनी याची सुरवात केली आणि नंतर 2010 मध्ये पायलट प्रकल्पाच्या माध्यमातून चार प्रमुख बँकांसह याची सुरुवात केली. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये 150 पेक्षा अधिक बँकांमध्ये याचा वापर होऊ लागला आहे. यामुळे लॅपटॉप आणि मोबाइलवरून निधी त्वरित हस्तांतरित करता येतो आणि ही सेवा निरंतर उपलब्ध असते. IMPS हस्तांतरणासाठी बँका नाममात्र शुल्क आकारले जाते.

IMPS हस्तांतरणाचे फायदे आणि तोटे

IMPS हस्तांतरणाचे फायदे

  • 24/7 उपलब्ध
  • त्वरित निधी हस्तांतरण
  • IMPS हस्तांतरण ऑनलाइन उपलब्ध आहे.
  • इंट्राबँक आणि इंटरबँक हस्तांतरणाची उपलब्धता
  • हस्तांतरणावर किमान रक्कम नाही.
  • SMS, मोबाइल, नेट बँकिंग, ATM इत्यादी हस्तांतरण उपलब्ध आहे –

IMPS हस्तांतरणाचे तोटे

  • कमाल हस्तांतरणावर मर्यादा आहे

IMPS हस्तांतरण कसे करावे?

इथे पायरी पायरीने IMPS हस्तांतरण प्रक्रिया आहे.

1. आपल्या बँकेच्या नेट बँकिंग पोर्टल किंवा वेबसाईटवर लॉग इन करा.

2. निधी हस्तांतरण पर्यायावर जा.

3. प्राप्तकर्त्याचा MMID आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा. तथापि, आपण आधार खाते क्रमांक किंवा IFSC क्रमांक देखील प्रविष्ट करू शकता.

4. हस्तांतरण रक्कम प्रविष्ट करा

5. हस्तांतरण विनंती प्रमाणित करण्यासाठी आपला PIN प्रविष्ट करा

6. आपणास आणि प्राप्तकर्त्यास निधी हस्तांतरण पूर्ण झाल्याचे SMS पुष्टीकरण प्राप्त होते.

ऑनलाईन बँकिंगने बँकिंग क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणले आहे तसेच आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याचा वेग आणि सोयीच्या बाबतीत RTGS, IMPS आणि NEFT ने बँकिंगमध्ये बदल घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या ब्लॉगवरून आपणास NEFT, RTGS, आणि IMPS विषयी पुरेशी मुलभूत माहिती मिळाली आहे अशी आम्ही आशा करतो. आर्थिक साक्षरतेविषयीच्या अधिक माहितीसाठी या ब्लॉग स्पेसचे अनुसरण करत रहा.