आधारकार्ड – आधारकार्ड म्हणजे काय? आधारकार्डचे फायदे आणि आधारकार्डसाठी अर्ज कसा करावा?

आधारकार्ड – आधारकार्ड म्हणजे काय? आधारकार्डचे फायदे आणि आधारकार्डसाठी अर्ज कसा करावा?

भारतीय नागरिकाच्या ओळखीसंदर्भातील आधारकार्ड हे एक अत्यंत महत्वपूर्ण कागदपत्र आहे. हे कार्ड धारकाच्या निवासी पत्त्याचा आणि फोटो ID चा पुरावा म्हणून काम करते. याव्यतिरिक्त, हे कागदपत्र हे संपूर्ण बँकिंग आणि दूरसंचार क्षेत्रासाठी एक महत्वपूर्ण बनले आहे, ज्यामध्ये बँक खाते क्रमांक आणि एखाद्याचा दूरध्वनी क्रमांक त्यांच्या आधारकार्ड क्रमांकाशी जोडलेला असतो. परंतु, मग आधारकार्ड म्हणजे काय? आधारकार्डसाठी अर्ज कसा करावा आणि आधारकार्ड असण्याचे काय फायदे आहेत? या ब्लॉगच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण बाबी पाहूया.

आधारकार्ड म्हणजे काय?

2009 मध्ये आधार लाँच झाले. भारत सरकारच्या वतीने युनिक आयडेंटीफिकेशन आॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) ने जारी केलेली ही 12 अंकी स्वतंत्र ओळख आहे. आधार क्रमांक हा ID पुरावा आणि पत्ता पुरावा म्हणून पूर्ण भारतात कोठेही चालू शकतो. वय आणि लिंग याचा विचार न करता भारतातील कोणताही रहिवासी UIDAI ने ठरविलेल्या पडताळणी प्रक्रियेत पात्र ठरल्यास तो आधारकार्डसाठी अर्ज करू शकतो. आता आपण आधारकार्डसाठी अर्ज कसा करायचा ते पाहू.

अल्पवयीन मुलांसाठी आधारकार्ड

अल्पवयीन आधारकार्डसाठी नोंदणी करू शकतात. पाच वर्षापेक्षा अल्पवयीन मुलांसाठी आधार अर्ज करताना अल्पवयीन मुलाचा जन्म दाखला आणि पालकांचे ID आणि पत्ता पुरावा सादर करणे आवश्यक आहे. पाच वर्षापेक्षा लहान मुलांना निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड मिळते.

परदेशी लोकांसाठी आधारकार्ड

भारतातील परदेशी रहिवासी, भारतीय नागरिक नसले तरी आधारसाठी अर्ज करू शकतात. तथापि, परदेशी जेव्हा मागील 12 महिन्यात 182 दिवसांपेक्षा जास्त दिवस भारतात वास्तव्य करत असेल तर तो आधारसाठी अर्ज करू शकतो.

आधारकार्डसाठी अर्ज कसा करायचा?

आधारसाठी अर्ज करणे सोपे आहे. आपल्याला फक्त सेट प्रक्रियेचे अनुसरण करावे लागेल. आधार अर्ज करण्याची प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने पाहूया.

  • आपल्या जवळील नोंदणी केंद्र शोधण्यासाठी https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1 येथे भेट द्या.
  • https://aadharcarduid.com/aadhaar-card-apply-online यावरून आॅनलाइन अपॉईंटमेंट नोंदवा. याशिवाय, आपण आधार केंद्राला अपॉईंटमेंट न घेता देखील भेट देऊ शकता.
  • ID, पत्ता आणि जन्मतारखेचा पुरावा सादर करा. ID पुरावा म्हणून लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फोटो ओळखपत्र इत्यादींचा समावेश आहे.
  • आवश्यक माहिती लिहून फॉर्म भरा आणि फॉर्म आणि कागदपत्रे सादर करा.
  • बायोमेट्रिक्स प्रक्रिया पूर्ण करा.
  • नोंदणी पुरावा म्हणून तुम्हाला एक पोचपावती मिळेल. यात 14 अंकी नोंदणी क्रमांक असेल जो आपल्याला आपल्या अर्जाची सद्य स्थिती शोधण्यासाठी मदत करेल.
  • एकदा पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली की आपले आधारकार्ड आपल्या निवासी पत्त्यावर पोस्टाने येईल. कृपया हे लक्षात घ्या की आपले आधारकार्ड मिळायला सुमारे तीन महिने लागतील.

आधारकार्डचे फायदे

आधारकार्ड असण्याचे अनेक फायदे त्याच्याशी निगडीत आहेत. काही महत्वपूर्ण गोष्टींमध्ये खालील घटकांचा समावेश होतो

  • जर आपण आपला आधारकार्ड क्रमांक EPFO कडे नोंदवला, तर PF ची रक्कम थेट आधारकार्ड धारकाकडे जमा होते.
  • जर आपला मोबाईल नंबर आधारसह नोंदवला असेल तर आपण आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळालेल्या OTP वरून कायदेशीर कागदपत्रांवर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करू शकता. ई-स्वाक्षरी वैध असून भारतात कोठेही लागू होऊ शकते.
  • आधार क्रमांकामुळे आपल्या आधारकार्डशी जोडलेल्या आपल्या बँक खात्यात LPG ची रक्कम थेट जमा होईल. आपल्याकडे आधीपासून कनेक्शन असल्यास, आपल्याला आपल्या गॅस एजन्सीला आधारकार्डची प्रत द्यावी लागेल.
  • आधारकार्ड असेल तर आपणास दहा दिवसात पासपोर्ट मिळतो.
  • आधार क्रमांकामुळे आपल्याला कागदपत्रांची पूर्तता न करता बँक खाते काढणे शक्य होते. आपण आधारकार्ड आणि किमान रोख रक्कम भरून भारतात कोठेही खाते उघडू शकता.
  • शिवाय, स्टायपेंड आणि शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक दिल्यास रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ शकते.

आधारकार्ड नाही? त्वरित अर्ज करा!

लक्षात ठेवा, आधार हे महत्वपूर्ण कागदपत्र असून आजकाल त्याची सगळीकडेच आवश्यकता भासते. तर आता आपल्याला आधारकार्ड काय आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत हे समजले. त्यामुळे जर आपल्याकडे आधारकार्ड नसेल तर त्यासाठी अर्ज करा. अधिक शैक्षणिक सामग्रीसाठी आमच्या ब्लॉग स्पेसचे अनुसरण करा आणि अर्थशिक्षणाच्या माध्यमातून आपली आर्थिक साक्षरता वाढवा.

बँकिंगचे 5 महत्त्वपूर्ण फायदे/बँकिंगचे फायदे

बँकिंगचे 5 महत्त्वपूर्ण फायदे/बँकिंगचे फायदे

साध्या शब्दात सांगायचे झाले तर बँक ही एक वित्तीय संस्था आहे, ज्यामध्ये आपल्याला पैसे जमा करणे, साठविणे, काढणे शक्य होते तसेच आपल्याला कर्जारूपाने (पैसे) दिले जातात. बँकिंग सेवेमुळे प्रत्येक अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण क्षेत्र तयार होते आणि एखाद्या विशिष्ट देशाच्या बँकिंग प्रणालीमुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांना अनेक लाभ मिळतात. या ब्लॉगच्या माध्यमातून बँकिंगचे पाच फायदे पाहू.

बँकिंगचे 5 फायदे

1. सुरक्षितता

बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित राहतात. जेव्हा आपण किंवा बाहेरील व्यक्ती खात्यामध्ये पैसे जमा करते तेव्हा बॅंका डिजिटल खाती तयार करतात. परिणामी आपल्याला घरामधील लॉकरमध्ये पैसे वाचविण्याचा धोका पत्करावा लागत नाही. त्याऐवजी, आपले पैसे बँकेत जमा केल्याने ते सुरक्षित राहतात.

2. बचत करणे शक्य होते

घरात पैसे ठेवल्याने अनावश्यक आणि अनियंत्रित खर्च होऊ शकतात. तथापि, बँकेत पैसे जमा केल्याने आपले पैसे वाचवायला मदत होते आणि तुम्ही ते गरज असेल तेव्हा त्याचा वापर करता यावा यासाठी आपल्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम असणे आवश्यक असते. याशिवाय, या दिवसांमध्ये रकमेचे निरंतरपणे आणि त्वरित हस्तांतरण करता यावे यासाठी बॅंकांकडून ATMs आणि मोबाइल अनुप्रयोगची ऑफर दिली जाते.

3. बचतीवर व्याज मिळते

बँका बचतीवर विशिष्ट व्याज दर देतात. जोखीम पत्करण्याऐवजी आणि आपल्या पारंपारिक घरच्या लॉकरमध्ये रोख रक्कम बाळगण्याऐवजी आपल्या बचतींवर काहीतरी कमावण्याची संधी आहे.

4. FD आणि RD सारखे गुंतवणूकीचे पारंपारिक पर्याय

बँका फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट (RD) सारखे गुंतवणूक पर्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहेत . FD करण्यासाठी आपणास आपल्या खात्यामध्ये काही विशिष्ट रक्कम जमा करणे आणि ती मुदतपूर्ती होईपर्यंत ठेवणे आवश्यक आहे. मुदतपूर्तीच्या वेळी आणि ठेवीच्या कालावधीनुसार आपणास त्यावर व्याज मिळते. आपण मासिक व्याज मिळविणे किंवा मुदतपूर्तीच्या वेळी, व्याजासह मुद्दल मिळवणे पर्याय निवडू शकता ज्यामुळे आपल्या बचत खात्यामध्ये पैसे जमा होतात किंवा FD चे स्वयं-नुतनीकरण केले जाते. दुसरीकडे, RD च्या बाबतीत आपल्याला RD खात्यामध्ये एका विशिष्ट तारखेला, विशिष्ट रक्कम, उदाहरणार्थ दरमहा रुपये 5,000/- भरणे आवश्यक आहे. मॅन्युअल बँकिंगच्या बाबतीत, आपल्याला ते स्वतःच भरावे लागतील. तथापि, आपल्या स्थायी सुचनांनुसार ई-बँकिंगच्या बाबतीत आपल्या खात्यातून रक्कम स्वयंचलितपणे वजा केली जाते किंवा आपण निर्दिष्ट तारखेला ती आपल्या RD खात्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन जमा करणे आवश्यक आहे. मुदतपूर्तीच्या वेळी मुद्दल आणि व्याज आपल्या खात्यामध्ये जमा होते.

5. कर्जासाठी अर्ज करणे

आर्थिक ईको-सिस्टीममध्ये बँका असण्याचा हा महत्वपूर्ण फायदा आहे. बँका कर्जाच्या रूपात पैसे देतात आणि कर्जदारास विशिष्ट व्याज दर आकारतात. कर्जदाराला निर्धारित वेळेमध्ये व्याजाची परतफेड करणे आवश्यक असते. अर्जदाराच्या प्रकरणाचा काळजीपूर्वक विचार करून आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर, बँका गृह कर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी विविध प्रकारचे कर्ज ऑफर करतात. या लेखामधून आपल्याला बँकिंगच्या लाभांविषयी चांगली माहिती मिळाली आहे अशी आम्ही आशा करतो. अर्थशिक्षण या पोर्टलच्या माध्यमातून देशातील प्रत्येक भागामध्ये FinTech विषयी जागरुकता वाढविणे आणि भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध स्थानिक भाषांमधील माहितीपूर्ण व्हिडिओ आणि ब्लॉग्जच्या साहाय्याने लोकांना या पोर्टलविषयी चांगली माहिती पुरविणे हे आमचे ध्येय आहे. म्हणूनच, अर्थशिक्षण पोर्टलवर सातत्याने भेट देऊन आमच्याबरोबर आपली आर्थिक जागरुकता वाढवत रहा.